भारतीय कृषी अनुसंधान परिषद - कापूस संशोधन संस्था नागपूर येथील शास्त्रज्ञांनी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे भेट दिली.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद - कापूस संशोधन संस्था नागपूर येथील शास्त्रज्ञांनी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे भेट दिली.


    यावेळी केंद्रिय कापुस संशोधन संस्था, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी च्या विविध कृषी विस्तार उपक्रमांची पाहणी केली व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर च्या सहाय्याने कृषी विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे राबविण्यात येणाऱ्या विशेष कापुस प्रकल्पा अंतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना कापुस पिकातील सघन व अतिघन लागवड तंत्रज्ञान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सदरील एकदिवसीय कार्यशाळेत दादालाड सघन कापूस लागवड प्रणालीच्या भित्तीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. सदरील कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील डॉ. माधुरी रेवणवार, प्रा. कपिल इंगळे, डॉ. कृष्णा अंभुरे, डॉ. प्रवीण चव्हाण, कापूस प्रकल्पातील प्रभुदास उडतेवार, बालाजी चंदापुरे हे उपस्थित होते. प्रा. कपिल इंगळे, विषय विशेषज्ञ-कृषीविद्या यांनी कापूस, सोयाबीन, तुर, ई. पिकांतील खत व्यवस्थापन, कमी खर्चातून जास्त नफा कसा मिळवावा, भरघोस उत्पन्न कसे काढावे, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था ई बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.  डॉ. माधुरी रेवणवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख यांनी पोषणासाठी पोषण परसबाग व पोषक तृणधान्य यांची दैनंदिन आहारातील महत्त्व बाबत सखोल मार्गदर्शन केले. सोबतच पोषण बाग लावण्यासाठी आवश्यक माहिती, नैसर्गिक पद्धतीने खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. डॉ. कृष्णा अंभूरे, विषय विशेषज्ञ- पीक संरक्षण यांनी कापूस पिकांतील कीड आणि रोग याबद्दल मार्गदर्शन देत असताना एकात्मिक कीड नियंत्रण करणे हा सल्ला दिला. तसेच निम अर्क, जैविक बुरशीनाशक यांबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने बावलगाव येथील महिला व पुरुष यांनी हजेरी लावून त्यांची शेती विषयी असलेली आवड दाखवून दिली. 



Post a Comment

0 Comments