विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत बावलगाव, ता. बिलोली येथे प्रक्षेत्र भेटी.

विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत बावलगाव, ता. बिलोली येथे प्रक्षेत्र भेटी.

 


दि. 23/08/2024 वार शुक्रवार रोजी बावळगाव येथे केंद्रिय कापूस संशोधन संस्था व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत निवडक शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली. यावेळी विशेष कापूस प्रकल्पातील प्रभुदास उडतेवार, बालाजी चंदापूरे यांनी थेट शेतावर जाऊन दादा लाड कापूस लागवड पद्धत द्वारे कापूस लागवड केली आहे याची अधिकृत तपासणी केली. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकामधे आलेल्या समस्यांबाबत शंकाप्रश्न उपस्थित केले. कपाशीची गळफांदी काढणे व शेंडे खुड करावयाचा सल्ला उपस्थित तज्ञांकडून देण्यात आला. यावेळी प्रकल्पा अंतर्गत सुचवलेल्या अंकुर वाणांची माहिती तसेच लागवड केलेल्या दोन वेग वेगळ्या वाणांमधील फरक सांगण्यात आला. केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या द्वारे अंकुर सीडस च्या वाणांच्या लागवडीचा सल्ला देण्यात आला असून त्यातील काही वाणां बद्दल –


कीर्ती

• भारी व मध्यम जमिनीत हंगामी ओलित तसेच कोरडवाहू करिता उपयुक्त.

• उभट मजबूत वाढणारे झाड.

• मोठे बोंड. वजन सरासरी 5 ते 6 ग्राम.

• रस शोषक किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी.


888

• अर्ध-मर्यादित, अर्ध-पसरट वाढणारे झाड.

• पात्यांचे बोंडात रुपांतराचे प्रमाण अधिक.

• गोलाकार-मोठे बोंड व बोंडाची सरासरी वजन 6-6.5 ग्रॅम.

• चांगले उमलणारे व वेचणीस सोपे.

• रसशोषक किडीस व पानांवरील रोगांस सहनशील


सदर भेटी दरम्यान माणिक शिरगिरे., बालाजी शिरगिरे, गंगाधर छप्पेवार, मारोती मदणुरे या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली

Post a Comment

0 Comments