केंद्रीय कापून संशोधन संस्था नागपूर व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या वतीने बावलगाव येथे शेती दिन संपन्न
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या अंतर्गत येणाऱ्या बिलोली तालुक्यातील बावलगाव येथे दिनांक 27 नोव्हेंबर रोजी श्री. सुभाष धनुरे यांच्या शेतात कापूस पिक - शेती दिन' कार्यक्रम घेण्यात आला.
व. ना. म. कृ. विद्यापीठा अंतर्गत असणाऱ्या कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथील शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे हे प्रमुख मार्गदर्शक होते. कापूस- किड व रोग व्यवस्थापन संदर्भात त्यांचे कापूस पिकातील योगदान अतुलनीय आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पुढील वर्षी कापूस लागवड करताना घेण्याची काळजी, जमीन निवड, खत व्यवस्थापन, संभाव्य किडी व त्यांचे निदान तसेच दादा लाड कापूस तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कसा फायदेशीर ठरला आहे या बद्दल त्यांनी विस्तृत अशी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सध्या असलेल्या हरभरा पीक, कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी यांबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला गावचे सरपंच श्री. गायकवाड यांनी हजेरी लावली होती तसेच त्यांनी त्यांच्या गावच्या काही शेतकऱ्यांनी दादा लाड कापूस तंत्रज्ञान अवलंब केला असून, त्यांना उत्पादनात फरक जाणवला असल्याचे सांगितले. श्री. माणिक शिरगिरे यांनी त्यांचे कापूस पिकाबद्दल मनोगत व्यक्त केले. श्री. शिरगिरे हे आपल्या शेतात नव नवीन प्रयोग करत असतात. त्यांना कापूस प्रकल्पातील ह्या दादा लाड तंत्रज्ञानाबद्दल कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या वतीने माहिती मिळाली व त्यांना ह्याचा लाभ झाला असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
तसेच पुढील वर्षी गावातील संपूर्ण शेतकरी दादा लाड पद्धत अवलंब करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. कपिल इंगळे यांनी शेतकऱ्यांना सध्या सुरू असलेल्या पिकांबद्दल माहिती दिली तसेच भरड धान्य पिक लागवड या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी नांदेड जिल्ह्याचे कापूस पिकातील योगदान, सध्या सुरू असलेला कापूस प्रकल्प, तसेच श्रेडर च्या सहाय्याने कापसाच्या पऱ्हाटी काढून त्यांची भुकटी करणे व जमिनीतील कर्ब वाढवणे या बद्दल माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या वतीने डॉ. कृष्णा अंभुरे, प्रा. कपिल इंगळे, श्री प्रभुदास उडतेवार, श्री बालाजी चंदापुरे व कृषी विभाग बिलोली यांच्या वतीने श्री.कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुदास उडतेवार यांनी केले व आभार प्रदर्शन बालाजी चंदापुरे यांनी मानले.
0 Comments