“कर्मयोगी बाबासाहेब देशमुख प्रयोगशील युवा शेतकरी”
व
“कर्मयोगी बाबासाहेब देशमुख युवा कृषि उद्योजक”
पुरस्कार २०२५
संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी द्वारे "कर्मयोगी बाबासाहेब देशमुख प्रयोगशील युवा शेतकरी" व "कर्मयोगी बाबासाहेब देशमुख युवा कृषि उद्योजक" पुरस्कार २०२५ करिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्करासाठी केवळ नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अर्ज करू शकतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जानेवारी पर्यंत आहे.
• पुरस्काराची श्रेणी :
⚜ ' कर्मयोगी बाबासाहेब देशमुख प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार' (पुरुष/महिला),
⚜ ' कर्मयोगी बाबासाहेब देशमुख युवा कृषि उद्योजक पुरस्कार' (पुरुष/महिला)
• वयोमर्यादा:
⚜ ' कृकर्मयोगी बाबासाहेब देशमुख प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार' (पुरुष/महिला) २५ ते ३५ वर्ष
⚜ ' कर्मयोगी बाबासाहेब देशमुख युवा कृषि उद्योजक पुरस्कार' (पुरुष/महिला) २५ ते ३५ वर्ष
• प्रस्ताव कोण पाठवू शकतो:
फक्त नांदेड जिल्ह्यातील पुरुष व महिला शेतकरी, कृषि क्षेत्रातील व्यावसायिक, युवा कृषि उद्योजक, कृषि स्टार्टअप, कृषिविषयक सर्व व्यवसाय, शेतकरी उत्पादक कंपनी, फळ प्रक्रिया उद्योग, कृषि व कृषि उद्योग क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ति.
• प्रस्ताव पाठवतांना:
पुरस्काराच्या प्रत्येक श्रेणीचा फॉर्म असून त्यासह आपला प्रस्ताव पोस्टाद्वारे, ईमेलद्वारे किवा गुगल लिंक द्वारे पाठवू शकतात यात संपूर्ण नाव, पत्ता व आपण राबविलेल्या शेतीतील अथवा कृषि उद्योग व संशोधन क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती, छायाचित्रे, वृत्तपत्रातील कात्रणे आदींसह आपले नामांकन प्रस्ताव पाठवावे.
• प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत
दि. १० जानेवारी २०२५, सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत.
(टीप-अंतिम मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत कृपया याची नोंद घ्यावी.)
• पुरस्कार वितरण
पुरस्कारार्थी निश्चित झाल्यावर कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे आयोजित कृषिवेद २०२५ या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते निवडक पुरस्कारार्थींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
• पुरस्कार वितरण ठिकाण
कृषिवेद २०२५, संस्कृति संवर्धन मंडळ द्वारे संचालित कृषि विज्ञान केंद्र, शारदा नगर,सगरोळी, ता. बिलोली , जिल्हा नांदेड-४३१७३१
• प्रस्ताव पाठवण्याचा पत्ता:
संस्कृति संवर्धन मंडळ द्वारे संचालित कृषि विज्ञान केंद्र, शारदा नगर,सगरोळी,
ता. बिलोली , जिल्हा नांदेड पिन ४३१७३१
ईमेल - kvksagroli@gmail.com
किंवा संपर्क – 8830750398, 8087697117
किवा आपण खालील लिंक वर क्लिक करून देखील आपले नामांकन भरू शकता.
१. 'कर्मयोगी बाबासाहेब देशमुख प्रयोगशील युवा शेतकरी' (पुरुष/महिला) https://forms.gle/H9421czPnFUVcpTY9
२. 'कर्मयोगी बाबासाहेब देशमुख युवा कृषि उद्योजक' (पुरुष/महिला) https://forms.gle/RxjWg9hYNwrmYGdX6
• महत्वाची सूचना:
प्रस्ताव पाठवताना अर्धवट पाठवलेले प्रस्ताव ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. प्रस्तावासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवावीत त्याशिवाय प्रस्तावाचा विचार होणार नाही. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुरस्कार वितरणाच्या आधी भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल. अंतिम निवडीचे सर्व अधिकार निवड समितीला राहतील
0 Comments