सोयाबीन पीकासाठी समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक –पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा
राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-तेलबिया पिके (खरीप 2025) अंतर्गत प्रात्यक्षिके संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, जि.नांदेड यांच्यावतीने खरीप हंगाम 2025 साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन -तेलबिया पिके अभियानांतर्गत 30 हेक्टर क्षेत्रावर 75 शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकाची समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिके राबवण्यात येणार आहेत. या प्रात्यक्षिकांसाठी धर्माबाद तालुक्यातील शेळगाव थडी, मास्टी आणि बाबुळगाव येथील 75 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले तसेच आवश्यक निविष्ठा (सुधारित बियाणे, जैविक खते व कीडनाशके इ.) चे पुरवठा करण्यात आले.प्रात्यक्षिकामध्ये खालील एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानांचा समावेश असेल:
सुधारित वाणांचा वापर
माती परीक्षणावर आधारित संतुलित खत व्यवस्थापन
बीबीएफ (Broad Bed Furrow) पद्धतीने पेरणी
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
एकात्मिक तण व्यवस्थापन
या प्रात्यक्षिकांचे नियोजन व अंमलबजावणी गोदामाई रुरल फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेळगाव थडी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. #खरीप२०२५ #Agriculture #ClimateSmartFarming #ClimateSmartFarming #सोयाबीन #तेलबिया #पिके #पेरणीपूर्व #प्रशिक्षण
0 Comments