नांदेड जिल्हा जागरूकता अभियान
महिलांच्या आहार आणि आरोग्यावर आपण नेहमीच कार्यक्रम घेत आलो आहोत. परंतु यावर्षी कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेतलेल्या संकल्पप्रमाणे संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्रातील गृह विज्ञान विभागाअंतर्गत महिलांचे गर्भाशयाचे आजार आणि मासिक पाळी मध्ये योग्य सॅनेटरी नॅपकिन चा वापर याबाबत पूर्ण नांदेड जिल्हा जागरूकता अभियान दाबित आहोत. याचाच एक भाग म्हणून नांदेड येथील मंत्री नगर भागात तेथील महिलांच्या मागणीनुसार कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमांमध्ये महिलांना सध्या गर्भाशयाच्या आजारांबद्दल सविस्तर माहिती देऊन मासिक पाळी मध्ये योग्य सॅनेटरी नॅपकिन ची निवड याबाबत सविस्तर चर्चा करून समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन यासाठी सौ. पल्लवी वडपलवार यांनी पुढाकार घेतला. यांनी यापुढे नांदेड भागातील महिलांना याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प देखील केला. # #women #womenpower #womenshealth #womensupportingwomen #womenhealth #womenhealthy #womenhealthawareness #womenhealth #womenhealthtips #womenhealthcare #WOMENHEALTHFIRST
0 Comments