घरगुती पातळीवर विविध मिलेट्सपासून खाद्यपदार्थांची निर्मिती
घरगुती पातळीवर विविध मिलेट्सपासून खाद्यपदार्थांची निर्मिती या विषयावरचे प्रशिक्षण कार्यक्रम दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी संस्कृति संवर्धन मंडळाच्या कृषि विज्ञान केंद्र आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत बावलगाव, तालुका बिलोली येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान डॉ. माधुरी रेवनवार यांनी महिलांना दैनंदिन आहारात विविध पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच घरगुती पातळीवर सहज तयार करता येणाऱ्या विविध मिलेट्स-आधारित पाककृतींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, ज्यामुळे पौष्टिक व हवामान प्रतिरोधक आहार पद्धतीचा प्रसार होईल. #मिलेट्स #तृणधान्ये #पौष्टिकआहार #आरोग्य #Millets #HealthyFood #Agriculture #SustainableAgriculture #TrainingProgramme
0 Comments