समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिके – खरीप २०२५, तेलबिया पिके : शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया पिके अंतर्गत खरीप २०२५ मध्ये संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड यांच्या वतीने धर्माबाद तालुक्यातील शेळगाव, मास्टी आणि बाबुळगाव या गावांमध्ये सोयाबीन पिकाची ३० हेक्टर क्षेत्रावर ७५ शेतकऱ्यांकडे समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिके राबवण्यात आली. ही प्रात्यक्षिके एकात्मिक पीक व्यवस्थापन या संकल्पनेवर आधारित आहेत. केंद्र सरकारकडून देश खाद्यतेलात आत्मनिर्भर व्हावा यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबवले जात आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सोयाबीन पिकाची घटती उत्पादकता व वाढता उत्पादन खर्च कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रशिक्षणादरम्यान खालील विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले –
- घरच्या घरी बियाणे निर्मिती
- जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन
- जैविक खत व जैविक कीडनाशकांचा वापर
- सोयाबीन पिकातील विविध कीड व रोगांची ओळख व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन
- लागवडीपासून काढणीपर्यंत यांत्रिकीकरण
- सोयाबीन पिकात मूल्यवर्धनाच्या संधी
नैसर्गिक शेतीचे मास्टर ट्रेनर श्री. माधव चिंचले यांनी मागील दोन वर्षांपासून कोणतेही रासायनिक खत व कीडनाशके न वापरता नैसर्गिक पद्धतीने सोयाबीन लागवडीचा अनुभव प्रत्यक्ष उदाहरणांसह मांडला. #शेतकरीप्रशिक्षण #खरीप२०२५ #सोयाबीनउत्पादन #शेती_विज्ञान #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #नांदेड #राष्ट्रीयखाद्यतेलअभियान #तेल_बियाणे #नैसर्गिकशेती #सेंद्रियशेती #एकात्मिककीडव्यवस्थापन #माझीशेती #SoybeanFarming #AgricultureTraining #KVK #Nanded #farminginmaharashtra
0 Comments