नैसर्गिक शेती प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
नायगाव तालुक्यातील बरबडा येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायगाव आणि संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांनी जैविक खते आणि कीडनाशके बांधावरच तयार करण्याचे तंत्रज्ञान, प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन, तसेच फळबाग लागवडीसंबंधी उपयुक्त माहिती आत्मसात केली.
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील तज्ञ प्रा. कपिल इंगळे, मंडळ कृषी अधिकारी श्री. बच्चेवार, उप कृषी अधिकारी श्री. चव्हाण यांच्यासह कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. बरबडा गावातील निवड झालेल्या शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला!
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले. #नैसर्गिकशेती #सेंद्रियशेती #शेतकरीप्रशिक्षण #कृषीविज्ञानकेंद्र #नायगाव #नांदेड #agriculture #farming #farmers #सगरोळी
0 Comments