आंबा लागवडीच्या तंत्रावर आधारित प्रशिक्षण

आंबा लागवडीच्या तंत्रावर आधारित प्रशिक्षण


कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे दि. २१ मे २०२५ रोजी आंबा लागवडीच्या तंत्रावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सुधारित आंबा लागवड तंत्राची माहिती देणे आणि आंबा शेतीच्या आर्थिक शक्यतांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.

या प्रशिक्षणामध्ये डॉ. संतोष चव्हाण (विषय विशेषज्ञ, फलोत्पादन), कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी मातीची पूर्वतयारी, हवामान योग्यतेचे निकष, विविध लागवड पद्धती व त्यांचे फायदे, अन्नद्रव्य व्यवस्थापन, जाती व लागवडीसाठी रोपांची निवड, कीड व रोग व्यवस्थापन, सिंचन पद्धती, काढणीपश्चात हाताळणी आणि विपणन धोरणे इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. अधिक उत्पादन व दर्जा सुधारण्यासाठी आधुनिक लागवड पद्धतींवर विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्र घेतले गेले, ज्यामध्ये खड्डे खोदणे व भरणे, लागवड पद्धत, छाटणी व व झाडांना आकार देणे, लागवडीसाठी चांगली रोपे कशी निवडावी याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या फळ रोपवाटिका येथे भेट देण्यात आली. # #agriculture #agriculture #agricultureeducation #mango #farming #training #trainingday #आंबा #लागवड #farmers #farmer



Post a Comment

0 Comments