सोयाबीन आहार – एक आरोग्यदायी पर्याय

सोयाबीन आहार – एक आरोग्यदायी पर्याय


दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी संस्कृति संवर्धन मंडळाचे कृषि विज्ञान केंद्र व हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प (BCRC) यांच्या संयुक्त विद्यमाने ता. बिलोली येथील बाबळी गावात शेतकरी महिला व स्वयं-सहायता गट सदस्यांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सहभागी महिलांना दैनंदिन आहारात सोयाबीनचा समावेश करण्याचे महत्त्व सविस्तरपणे सांगण्यात आले. तसेच सोयाबीनपासून तयार होणारे चिवडा व सोयाने या उत्पादनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांची तयार करण्याची पद्धत व त्यांचे पोषणमूल्य याची माहितीही देण्यात आली. 
#सोयाबीन #आहार #हवामानालाअनुकूलविकास #शेतकरीमहिला #पोषणमूल्य #आरोग्यदायीआहार #ग्रामीणविकास

Post a Comment

0 Comments