एक दिवसीय कापूस पीक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम गाव करडखेड, ता. देगलूर

एक दिवसीय कापूस पीक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम गाव करडखेड, ता. देगलूर



केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR), नागपूर आणि संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कापूस प्रकल्पात शेतकऱ्यांना कापसाच्या सुधारित लागवड पद्धती आणि व्यवस्थापनावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी डॉ. कृष्णा अंभुरे यांनी गळ फांद्यांचे छाटणीकरण, योग्य खत व्यवस्थापन, निंदण नियंत्रण उपाय आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) - ज्यात पिवळे व निळे चिकट सापळे आणि निंबोळी अर्काचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमात दादा लाड तंत्रज्ञानाचा अवलंब ४० एकर शेतकऱ्यांच्या शेतात करण्यात येणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट फायदा मिळेल. प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर नेऊन तांत्रिक माहितीचा वापर कसा करायचा हे दाखवण्यात आले. श्री. प्रभुदास उडतेवार आणि श्री. बालाजी चंदापुरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त केले असून, ते त्याचा अवलंब करण्यास उत्सुक आहेत! #CottonFarming #Agriculture #FarmerTraining #Deglur #Nanded #CICR #KVK #CottonManagement #शेतकरी #कापूस #कृषीविज्ञान #शेतकरीप्रशिक्षण #नांदेड #देगलूर

Post a Comment

0 Comments