शेतीद्वारे महिलांची उत्पन्नवाढ
"शेतीद्वारे महिलांची उत्पन्नवाढ” या विषयावरचा प्रशिक्षण कार्यक्रम हर्नळी गाव, ता. बिलोली येथे संस्कृति संवर्धन मंडळाचे कृषि विज्ञान केंद्र आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प प्रोजेक्ट (BCRC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. डॉ. मधुरी रेवणवार यांनी महिलांचा शेतीमधील महत्वाचा सहभाग स्पष्ट करून सांगितला तसेच शेतीपूरक उपक्रम जसे की शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय व अन्नप्रक्रिया यांच्या माध्यमातून कुटुंबाचे उत्पन्न कसे वाढविता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला व युवकांनी शासकीय योजना व प्रकल्प यांच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले. तसेच युवकांनी मृदा परीक्षण व फळझाडांच्या लागवडीद्वारे पिकांचे विविधीकरण याबद्दलही उत्सुकता दाखवली. # #women #womenpower #WomensHealth #WomenInBusiness #womenentrepreneurs #womensupportingwomen #womenempowerwomen #WomenEmpowerments #womenempoweringwomen #womenempoweringwomen


0 Comments