निमटेक येथे हळद पिकावरील स्विकार्य चाचणी प्रयोगाचे
निमटेक येथे हळद पिकावरील स्विकार्य चाचणी प्रयोगाचे आयोजन, संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत निमटेक ता. उमरी येथे हळद पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सीस्ट्रोबीन १८.२% + डायफेनोकोनाझोल ११.४% या संयुक्त बुरशीनाशकाचा पंधरा दिवसांच्या अंतराने वापर या स्वीकार्य चाचणी प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. या चाचणी प्रयोगाविषयी मार्गदर्शन करताना डॉ. कृष्णा अंभुरे यांनी हळद पिकावरील करपा रोगाची कारणे, प्रसार व व्यवस्थापन याबद्दल सखोल मागदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना हळद पिकावरील ईतर कीड व रोग जसे कंदमाशी, कंदकुज, हुमणी अळी यांच्या एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन या विषयावर देखील मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर उपस्थित शेतकऱ्यांमधून निवडक शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप करण्यात आल्या. ह्या प्रयोगासाठी प्रत्येकी एक एकर हळद क्षेत्रासह १५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी गाजरगवत जागरुकता सप्ताह अंतर्गत शेतकऱ्यांना गाजर गवताचे दुष्परिणाम व व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली. #turmeric #turmericfarm #turmericfarms #turmericfarmer #TurmericFarming #turmericfarming #turmericfarming

0 Comments