विस्तार कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

विस्तार कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन



कृषि विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे संस्कृति संवर्धन मंडळ संस्था अंतर्गत चालणारे केंद्रित विकास प्रकल्प, समृद्धी प्रकल्प, कुशावाडी पाणलोट विकास प्रकल्प, हवामान अनुकूल शास्वत विकास प्रकल्प, शेततळे प्रकल्प या वेगवेगळ्या प्रकल्पात प्रक्षेत्र स्तरावर काम करणाऱ्या विस्तार कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांचे योग्य निरसन करण्याच्या अनुषंगाने क्षमता बांधणीसाठी खरीप हंगामातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. कृष्णा अंभुरे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिके कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद, ऊस इत्यादी विविध पिकांवरील कीड व रोगांची ओळख व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल सखोल मार्गदर्शन केले व प्रक्षेत्र स्तरावर शेतकऱ्यांमार्फत येणाऱ्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षण कार्यक्रमात पुढे डॉ. संतोष चव्हाण यांनी सद्यस्थितीतील फळबाग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संस्था अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पातील २५ विस्तार कार्यकर्ते उपस्थित होते. #agriculture #Agricultural #ağrı #agri #agricultura #training #trainingday #extension #worker

Post a Comment

0 Comments