ग्रामविकास आणि उद्योजकतेचा अभिनव कार्यक्रम!

 ग्रामविकास आणि उद्योजकतेचा अभिनव कार्यक्रम!


कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, उद्यमिता लर्निंग सेंटर आणि वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR), जिल्हा बीदर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक राज्यातील खर्डा (ता.औराद, जि.बीदर) येथील शेतकऱ्यांसाठी एक विशेष दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात ग्रामविकास समिती (VDC) सदस्यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश ग्रामपातळीवर ग्रामविकास आणि उद्योजकतेच्या संधी कशा शोधायच्या याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देणे हा होता. डॉ. माधुरी रेवनवार यांनी मार्गदर्शन केले आणि स्थानिक संसाधनांचा उपयोग करून स्वतःच्या उपजीविकेच्या संधी कशा निर्माण करायच्या यावर सखोल चर्चा केली. एकूण 25 शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते.या प्रशिक्षणाने शेतकऱ्यांना ग्रामविकासासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवण्यास मदत केली आहे. #ग्रामविकास #उद्योजकता #शेतकरी_प्रशिक्षण #कौशल्यविकास #WOTR #कृषीविज्ञानकेंद्र_सगरोळी #खर्डा #कर्नाटक


Post a Comment

0 Comments