रब्बी हंगाम पूर्वतयारी व पौष्टिक भरडधान्य (श्री अन्न) लागवड प्रशिक्षण कार्यक्रम

रब्बी हंगाम पूर्वतयारी व पौष्टिक भरडधान्य (श्री अन्न) लागवड प्रशिक्षण कार्यक्रम



प्रशिक्षणामध्ये कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील तज्ज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी रब्बी हंगामात लागवड होणाऱ्या भरडधान्य पिके, विशेषतः रब्बी ज्वारी बाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमामध्ये खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला: रब्बी ज्वारी क्षेत्र व उत्पादन वाढविणे यासाठी जैवसंतृप्तवान "परभणी शक्ती" वाण वापरून प्रात्यक्षिके. हुरडा ज्वारीचे प्रात्यक्षिके व उत्पादनवाढीसाठी पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, तसेच महिला स्वयंसहायता गट यांच्या माध्यमातून भरडधान्य प्रक्रिया उद्योग उभारणी. जिल्ह्याच्या कृषी आराखड्यामध्ये वरील सर्व बाबींचा समावेश करण्याचे नियोजन. हरभरा पिकाला पर्याय म्हणून करडई, चिया आदी पिकांची निवड करून प्रात्यक्षिक पद्धतीने लागवडीचे नियोजन.
या प्रशिक्षणामध्ये 60 पेक्षा अधिक कृषी विभागातील अधिकारी सहभागी झाले होते. कृषी विभाग, नांदेड यांच्या वतीने रब्बी हंगाम पूर्वतयारी व पौष्टिक भरडधान्य (श्री अन्न) लागवड विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी – विशेषतः तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सहभाग घेतला. #Agriculture #kvksagroli #farmers #training #रब्बीहंगाम #श्रीअन्न #भरडधान्य #नांदेडकृषीविभाग #शेतकरी #कृषीप्रशिक्षण

Post a Comment

0 Comments