केंद्रीय कापूस संशोधन संस्था व संस्कृति संवर्धन मंडळ - कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कापूस प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरु
केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या कापूस प्रकल्पाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, त्याअंतर्गत आज मरवळी गावातील निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कापूस पिकासंबंधी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. प्रक्षेत्र भेटीमध्ये शेंडा खुडणी (Detopping) या अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर भर देण्यात आला. झाडाच्या शेंड्याची वेळेत खुडणी केल्यास उत्पादनात वाढ होते, झाडाची उंची नियंत्रित होऊन फांद्यांची वाढ चांगली होते, परिणामी अधिक फुलं आणि बोंडं लागतात हे शेतकऱ्यांना पटवून दिले. शेतकऱ्यांनी दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या शेतीत करून उत्पादन वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. कलम कैंची च्या सहाय्याने शेंडा कधी व कश्या प्रकारे काढायचा यावर प्रशिक्षण देण्यात आले. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून, शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून शाश्वत आणि अधिक उत्पादनक्षम शेती साध्य करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. #CottonProject #AgricultureMaharashtra #FarmerEmpowerment #कापूस #कापूसशेती #कृषीतंत्रज्ञान #शेंडाखुडणी #Detopping #शाश्वतशेती #उत्पादनवाढ #कापूसप्रकल्प #केंद्रीयकापूससंशोधनसंस्था #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #शेतकरीशिक्षण #दादालाड
0 Comments