बावलगावमध्ये १३ वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

बावलगावमध्ये १३ वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न


कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या वतीने बावलगाव येथे आयोजित कार्यक्रमात गांडूळखत निर्मितीचे प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले. जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक खतनिर्मिती आणि स्वच्छता अभियानाशी सुसंगत उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये जैविक शेतीविषयी नवचैतन्य निर्माण झाले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनातील नवकल्पना आणि शाश्वत शेतीविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता.
🔹
चर्चेतील विषय: रब्बी पीक नियोजन, मृदा आरोग्य, महिला-युवा योजना, कृषी मालाचे मूल्यवर्धन, फळबाग लागवडीसाठी माहिती, ऊस पिकाविषयीं चर्चा, कृषि समृद्धी योजना इत्यादी.
🔹
सहभाग: ३० शेतकरी व ग्रामीण युवक
🔹
ठळक मुद्दे: गांडूळखत प्रक्रिया, विक्री संधी, युनिट स्थापनेची तयारी. या संवादामध्ये शेतकऱ्यांनी वरील विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची संबंधित तज्ञांनी उत्तरे देत मार्गदर्शन केले.
🔹
सहभागी तज्ञ: डॉ. संतोष , डॉ. कृष्णा, डॉ. प्रवीण, डॉ. प्रियांका, व डॉ. निहाल हा उपक्रम शाश्वत शेती, जैविक उत्पादन आणि ग्रामीण उद्योजकतेस चालना देणारा ठरला. #शेतकरीशास्त्रज्ञसुसंवाद #बावलगाव #कृषिविज्ञानकेंद्रसगरोळी #गांडूळखत #जैविकशेती #रब्बीपिकनियोजन #शाश्वतशेती #मृदाआरोग्य #युवाशेतकरी #कृषीसंवाद




Post a Comment

0 Comments