जीरोना येथे १८ वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न; तज्ज्ञांकडून नैसर्गिक शेती व माती परीक्षणाचे धडे

जीरोना येथे १८ वा शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न; तज्ज्ञांकडून नैसर्गिक शेती व माती परीक्षणाचे धडे


​शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि जमिनीचे आरोग्य टिकवून शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे, या उद्देशाने आदर्श गाव जीरोना येथे १८ व्या 'शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद' कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कृषि विज्ञान केंद्र, नांदेड 2, (सगरोळी) आणि कृषी विभाग, उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेतीची गुरुकिल्ली दिली.
​कार्यक्रमाचे आयोजन कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षण का आवश्यक आहे आणि सेंद्रिय निविष्ठांच्या वापरामुळे उत्पादनात कशी भर पडते, यावर सविस्तर प्रकाश टाकला. रासायनिक खतांचा बेसुमार वापर टाळून जमिनीचा पोत कसा जपावा, याचे धडे यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आले.
​या कार्यक्रमास पिक संरक्षण तज्ञ डॉ. कृष्णा अंभुरे, उमरीचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री. विनोदकुमार एनलोड आणि उप कृषी अधिकारी डॉ. किशन मनुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या व शंकांचे थेट निराकरण केले. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व शासकीय योजनांविषयी शेतकऱ्यांना थेट माहिती दिली.शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील या थेट संवादामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेतीबद्दल नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. #agriculture #kvksagroli #शेतकरी #शास्त्रज्ञ #सुसंवाद #कार्यक्रम #कृषी_विभाग #उमरी #आधुनिक_तंत्रज्ञान #नैसर्गिक #शेती


🌱 Empowering Farmers through Science: 18th Farmer-Scientist Interaction at Jirona!

To reduce cultivation costs and prioritize soil health for sustainable growth, the 18th 'Farmer-Scientist Interaction' was successfully organized at the ideal village of Jirona. This collaborative initiative by Krishi Vigyan Kendra, Sagroli and the Department of Agriculture, Umri, provided a vital platform for farmers to gain insights into modern technology and the "keys" to successful natural farming.
💡 Key Takeaways from the Session:
- Soil Health First: Experts emphasized the critical importance of soil testing as the first step toward informed farming.
- Natural Inputs: Discussions focused on how organic inputs can boost productivity while restoring the soil’s natural texture, moving away from the excessive use of chemical fertilizers.
- Direct Solutions: Farmers had their specific agricultural queries resolved in real-time by subject matter experts.
- Government Support: Officials provided direct information on various government schemes designed to benefit the farming community.
The program was organized by Dr. Pravin Chavan, Agricultural Extension Scientist. Valuable guidance was provided by: Dr. Krishna Ambure, Crop Protection Expert, Shri.Vinodkumar Enlod, Assistant Agricultural Officer, Umri Dr. Kishan Manurkar, Deputy Agricultural Officer. This direct bridge between scientific research and field application is inspiring a new wave of sustainable agriculture in the region. Bridging Science

Post a Comment

0 Comments