सोशल मीडिया ते प्रत्यक्ष शेती: नागपूरचे शेतकरी पोहोचले केव्हीके सगरोळीला!

सोशल मीडिया ते प्रत्यक्ष शेती: नागपूरचे शेतकरी पोहोचले केव्हीके सगरोळीला!


📲🚜🌱
सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान सातासमुद्रापार नाही, तरी राज्याच्या कानाकोपऱ्यात नक्कीच पोहोचत आहे, याचा प्रत्यय नुकताच आला!
नागपूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानेश्वर जाधव यांनी KVK सगरोळीच्या सोशल मीडियावरील दर्जेदार व्हिडिओ आणि माहिती पाहून प्रभावित होऊन, थेट कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी (जि. नांदेड) येथील प्रक्षेत्राला भेट दिली. केवळ माहिती घेऊनच ते थांबले नाहीत, तर आपल्या शेतीसाठी त्यांनी उच्च गुणवत्तेच्या रोपांची खरेदी केली.
✅ काय नेले सोबत? 🥭 आंबा: केशर आणि इतर जातींची दर्जेदार कलमे.
🍋 लिंबू: भरपूर उत्पादन देणारी सुधारित रोपे. 🥗 कर्ठुले (रानभाजी): आरोग्यासाठी पौष्टिक आणि व्यापारी दृष्ट्या फायदेशीर कर्ठुले लागवड साहित्य.
विदर्भातून मराठवाड्यात येऊन, तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून ही रोपे खरेदी करणे, हे कृषि विज्ञान केंद्र, सगरोळीच्या कामाची पावतीच आहे. शेतकऱ्यांचा हा विश्वासच आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतो. आम्ही या सर्व शेतकरी बांधवांच्या जिद्दीला सलाम करतो. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 8668581462 #agricultura #AgricultureImpact #SuccessStory #NagpurFarmers #Horticulture #SustainableFarming #SocialMediaImpact #AgriTech #आंबालागवड #लिंबूशेती #कर्ठुले #प्रगतशीलशेतकरी #KVKSagroli #DigitalAgriculture #कृषीविज्ञानकेंद्रसगरोळी #ImpactStory

Post a Comment

0 Comments