सीताफळाचे मूल्यवर्धन याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
सिताफळ हे एक नाशवंत फळ आहे. पिकलेले फळ एक दिवसा पेक्षा जास्त टिकत नाही. म्हणूनच त्यावर प्रक्रिया करून टिकवणे हे महत्त्वाचे आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा, मुखेड या भागामध्ये सीताफळाचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. परंतु सीताफळाला योग्य दर मिळत नाही. म्हणूनच त्यावर प्रक्रिया करून सीताफळाचा गर टिकवून ठेवला तर शेतकऱ्यांना आर्थिक फायदा जास्त होतो. म्हणूनच सीताफळाचे मूल्यवर्धन याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि आत्मा, कृषी विभाग कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आला. या प्रशिक्षणासाठी कंधार तालुक्यातील रुई या गावातील शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षणा दरम्यान शेतकऱ्यांना सीताफळाचे आरोग्यासाठी महत्त्व आणि प्रक्रियेची गरज समजावून सांगन सिताफळ प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शेतकऱ्यांनी सिताफळ प्रक्रियेचा स्वतः अनुभव घेतला. #processing #farm #sagroli #food #kvk #nanded #rural #custedapple
#postharvest #farmers #trainingday #सिताफळप्रक्रिया #फळ
0 Comments