ज्वारी हे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख भरडधान्य पिक आहे,


ज्वारी हे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख भरडधान्य पिक आहे, परंतु मागील ३-४ वर्षापासून ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे परिणामी उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या मार्फत “ज्वारीवरील अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन” याविषयावर स्वीकार्य चाचणी प्रयोग १५ शेतकऱ्यांच्या प्रति एक एकर प्रक्षेत्रावर मांजरम ता.
नायगाव जि.नांदेड येथे राबविण्यात आला. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना ज्वारीवरील अमेरिकन लष्करी अळीची ओळख तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठांचे वाटप केले. #farms #soil #हवामान_अंदाज #water #farmer #farming #agriculture #kvksagroli #krushived #climatechange #climatefriendly #Farmingpractices #sorghum #ज्वारी







Post a Comment

0 Comments