कुशावाडी येथे जागतिक मृदा दिन साजरा...

 कुशावाडी येथे जागतिक मृदा दिन साजरा...


🌱🌱
संस्कृती संवर्धन मंडळ व हॅपी सॉईल प्रकल्प अंतर्गत आज दिनांक 05-12-2022 रोजी कुशावाडी तालुका. देगलूर येथे "जागतिक मृदा दिवस " दिनाचे अवचित्य साधून 100 शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण व मार्गदर्शन करण्यात आले. जमीन आरोग्य पत्रिकेचे मार्गदर्शक म्हणून कृषि विज्ञान केंद्र सगरोळी चे श्री कपिल इंगळे सर सेंद्रिय कर्ब चे महत्व व उपाय योजना या विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. वेस्ट डी कंपोजर चे महत्व व प्रात्यक्षिक रित्या दाखवण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री निशिकांत इनामदार विभागीय प्रशिक्षण मॅनेजर महाधन यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिक रासायनिक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले. गावातील ज्येष्ठ प्राध्यापक श्री गंगाधर हिंगोले यांनी खालावत चाललेल्या सेंद्रिय कर्ब याविषयी जागरूकतेचा आव्हान शेतकऱ्यांशी करण्यात आले. प्रमुख उपस्थिती श्री वसंत रावणगावकर देगलूर विभागीय पाणलोट क्षेत्र तसेच हॅपी साइल प्रकल्प समन्वयक श्री सुनील भोईवार व पवन जाधव यांची उपस्थित होते. हॅप्पी सॉईल प्रकल्प व्यवस्थापक श्री माधव राजुरे यांनी उपस्थित 60 हून अधिक शेतकर्यांचे आभार मानण्यात आले. #soilhealth #card #world #soil #health #day #5december #kvksagroli #nanded #जागतिक #मृा #दिस #worldsoilday #worldsoilday2022






Post a Comment

0 Comments