अन्न सुरक्षेसाठी महत्वाची आहे माती, या मातीचे संवर्धन करा..दिलीप दमय्यावार- जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड

 अन्न सुरक्षेसाठी महत्वाची आहे माती, या मातीचे संवर्धन करा..दिलीप दमय्यावार- जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड


-यावर्षीचे जागतिक मृदादिनाची संकल्पना हि, माती- ज्या ठिकाणी अन्नसाखळीच्या सुरुवात होते अशी आहे. रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे,मातीच्या प्रदुषणात वाढ होत आहे .त्याचा परिणाम अन्नसुरक्षेवर झाल्याच दिसून येत आहे. लाठ खु.तालुका कंधार येथे नाबार्डअंतर्गत हवामान बदल अनुकूल कार्यक्रम आणि संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमान दि. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाच्या निमित्याने महिलांसाठी मृदा संवर्धन तसेच नेतृत्व विकास मेळावा सरपंच रंजनाताई कऊटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. श्री दिलीप दमय्यावर यांनी अलीकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते ,शहरीकरणासाठी आणि उद्योग धंद्यासाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम पर्यावरणाचा ऱ्हास आणि अश्या प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय .केवळ एक इंच सुपीक मृदेच थर तयार होण्यासाठी आठशे ते हजार वर्षाचा कालावधी लागतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मृदा संवर्धन करणे हि काळाची गरज आहे ,याची जाणीव करून कृती करायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ.माधुरी रेवणवार यांनी जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे महत्व सांगून जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताची मात्रा द्यावी असा सल्ला दिला. रासायनिक खते व पाण्याचा अनिर्बंध वापर.सेंद्रिय खताचा वापर आदी कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे असून जैविक खत.गांडूळ खत ,जीवामृत ,दशपर्णी आदीचा वापर शेतकऱ्यांनी वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे समन्वयिका सौ रेवती कानगुले यांनी महिला उद्योग व्यवसाय विषयी माहिती दिली. ग्रामीण महिला पारंपारिक तंत्रज्ञानामधे अडकल्याने त्यांना नवीन तंत्रज्ञान तसेच उद्योगाचा अवलंब करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होत नाहीत.व्यवसाय करण्याबाबतच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे महिलांना उद्योजक बनण्यात अडथळे येतात. #world #soil #health #day #5december #kvksagroli #nanded #जागतिक #मृदा #दिवस #worldsoilday #WorldSoilDay2022




Post a Comment

0 Comments