पीक उत्पादनात मातीच्या आरोग्याचे महत्त्व तसेच मातीचे आरोग्य सुधारण्याबाबत मार्गदर्शन.

 पीक उत्पादनात मातीच्या आरोग्याचे महत्त्व तसेच मातीचे आरोग्य सुधारण्याबाबत मार्गदर्शन.


संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जि. नांदेड आणि कृषी विभाग, बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने कामरसपल्ली ता. बिलोली येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. डॉ. कृष्णा अंभुरे, विषय विशेषज्ञ पिक संरक्षण यांनी शेतकर्यांना पीक उत्पादनात मातीच्या आरोग्याचे महत्त्व तसेच मातीचे आरोग्य सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी शेतकऱ्यांना रब्बी पिकांमधील एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी किट वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. श्री. एस.जी. कांबळे, BTM, आत्मा, यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया या योजनेबद्दल मार्गदर्शन केले आणि श्री. एल.के.कोकणे, कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला श्री. डी.पी. मादाळे, मंडळ कृषी अधिकारी आणि श्री. एम.बी. शेळके, पोकरा प्रकल्प उपस्थित होते. #soilhealth #card #world #soil #health #day #5december #kvksagroli #nanded #जागतिक #मृदा #दिवस #worldsoilday #worldsoilday2022
🌍🌱





Post a Comment

0 Comments