शेतकर्यांच्या शेतावर जीवामृत कसे तयार करावे याबाबतचा डेमो देण्यात आला

 शेतकर्यांच्या शेतावर जीवामृत कसे तयार करावे याबाबतचा डेमो देण्यात आला


संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र यांच्या मार्फत चालत असलेल्या हॅपी सॉईल या प्रकल्पाच्या माध्यमातून काठेवाडी येथील शेतकरी श्री. अंतेश्वर पाटील यांच्या शेतावर जीवामृत कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले व त्यासोबतच जीवामृत चे महत्व ज्या मध्ये जमिनीतील सूक्ष्म जीवांच्या संख्येत वाढ होते, जमिनीतील पोषक अन्नद्रव्ये पिकांना हव्या त्या स्वरूपात उपलब्ध व्हायला मदत होते, जमीन सुपीक होते, शेतकऱ्यांचा कीटकनाशकावरील खर्च कमी होतो अशी सविस्तर माहिती सांगण्यात आली. #farms #soil #water #farmer #farming #agriculture #kvksagroli #krushived #climatechange #climatefriendly #farmingpractices #demo #Happy #soil #soilhealth





Post a Comment

0 Comments