सेंद्रिय आणि विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी पोषण परसबाग...

 सेंद्रिय आणि विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी पोषण परसबाग...




मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय आणि विषमुक्त भाजीपाला खाणे अतिशय महत्त्वाचा आहे. भाज्यांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. महिलांमधील रक्तक्षय तसेच हाडांचे आजार कमी करण्यासाठी भाज्यांचे दैनंदिन आहारात भरपूर प्रमाणामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने महिलांनी पोषण परसबागेची निर्मिती करणे आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत दरवर्षी नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोषण परसबागेची प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण दिल्या जाते. याचाच एक भाग म्हणून देगलूर तालुक्यातील होट्टल या संस्कृती संवर्धन मंडळाच्या पाणलोट विकास प्रकल्पातील गावांमध्ये पोषण परसबागेचे गंगामा मंडल हे मॉडेल चे प्रात्यक्षिक देण्यात आले. यामध्ये महिलांना पोषण परसबागेचे महत्त्व सांगून गंगामंडलचे प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष आखणी करून दाखवण्यात आली. सदरील प्रात्यक्षिकानंतर गावामध्ये अनेक पोषण परसबाग तयार झाले आहेत. #farm #sagroli #food #kvk #nanded #rural #women #empowerment #kvksagroli





Post a Comment

0 Comments