तूर पिकातील एकात्मिक पिक व्यवस्थापन

 तूर पिकातील एकात्मिक पिक व्यवस्थापन


राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रायोजित समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक “तूर पिकातील एकात्मिक पिक व्यवस्थापन” बिलोली तालुक्यातील तळणी आणि चिंचाळा या दोन गावांमध्ये 50 शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्येकी 1 एकर क्षेत्रावर 2022 च्या खरीप हंगामात राबविण्यात आले. पीक उत्कृष्ट स्थितीत आणि शेंगा भरण्याच्या टप्प्यात आहे आणि शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीच्या तुलनेत जास्त उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.कृष्णा अंभुरे यांनी तळणी येथे शेतकऱ्यांसह शेतीदिन साजरा करून प्रात्यक्षिक शेतांना भेट दिली. सहभागी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या प्रात्यक्षिकांवर समाधान मत व्यक्त केले. पुढे त्यांनी सांगितले की गावरान बियाण्यांच्या तुलनेत या जातीला फायटोफथोरा बुरशीजन्य (स्थानिक भाषेत: तूर उधळणे) रोगाचा कमी परिणाम दिसून आला आणि नवीन वाण BDN-2013-41 (गोदावरी) चे बियाणे पुढील हंगामासाठी साठवून पुढील प्रसार करणार असल्याचे मत व्यक्त केले. #farming #agriculture #हवामान_अंदाज #kvksagroli #krushived #climatechange #climatefriendly #हवामान_अंदाज #farmingpractices #kvksagroli #राष्ट्रीयअन्नसुरक्षायोजना #तूर





Post a Comment

0 Comments