टोमाटो पिकामध्ये आच्छादनाचाचा वापर..

 टोमाटो पिकामध्ये आच्छादनाचाचा वापर..


संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत हिप्परगा माळ ता नायगाव येथे टोमाटो पिकामध्य आच्छादनाचाचा वापर या विषयावर शेती दिन घेण्यात आला. टोमाटो लागवड करताना आच्छादनाचाचा वापर केल्यामुळे तणांचे नियंत्रण होते, दिलेली खते पूर्णपणे पिकाला मिळतात तसेच मजुरांची बचत होते. मातीचे योग्य तापमान राखल्यामुळे जिवाणूंची चांगली वाढ होते. आच्छादनामुळे फळांचा मातीशी संपर्क न आल्यामुळे फळांची प्रत सुधारते. रोग व किडींचे चांगले नियंत्रण मिळते. या पद्धतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो. या तंत्रज्ञाचा प्रथम रेषीय प्रात्यक्षिक हिप्परगा माळ ता नायगाव येथे घेण्यात आलेले होते. या तंत्रज्ञानाचा भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना अधिक फायदा मिळावा या अनुषंगाने हिप्परगा माळ येथे शेती दिनाचे अयोजेन गुरुवार दि ८/१२/२०२२ रोजी करण्यात आले होते. #vegetables #agriculture #nanded #fertilization #kvksagroli #tomato

Post a Comment

0 Comments