प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना PMFME अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना PMFME अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न


केंद्र शासना मार्फत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत "प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना" देशभरामध्ये राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. ही योजना असंघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता आहे. याचा कालावधी सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाचा असून एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा नांदेड व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्यावतीने दिनांक २०,२१,२२ डिसेंबर रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिकांसह हळद पावडर,मसाले निर्मिती, फळ प्रक्रिया उद्योग, डाल मिल, आईसक्रीम उद्योग तसेच विविध पिकांचे काढणी पाश्चात तंत्रज्ञान व विपणन यासह नवीन उद्योग उभारताना करावयाची बिज-भांडवल निर्मिती या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र,नांदेड चे प्रकल्प अधिकारी श्री.शंकर पवार व श्री.दीपक गायकवाड यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ.माधुरी रेवनवार व प्रा.व्यंकट शिंदे यांनी ही मार्गदर्शन केले. #pmfmescheme #kvksagroli #AzaadiKaAmritMahotsav #IndiaAt75 #PMFME #InternationalYearofMillets #foodprocessing #agriculture






 

Post a Comment

0 Comments