महिला बचत गटाला योग्य उद्योग व्यवसाय निवडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे मार्गदर्शन

महिला बचत गटाला योग्य उद्योग व्यवसाय निवडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे मार्गदर्शन



संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता महिला बचत गटांच्या सदस्या उद्योग व्यवसायाकडे वळण्यासाठी इच्छा व्यक्त करतात. अनेक बचत गटांकडून मार्गदर्शनासाठी नियमित मागणी येत असते. याच अनुषंगाने आज दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी मुखेड येथील महिला बचत गटाला योग्य उद्योग व्यवसाय निवडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. माधुरी रेवनवार यांनी गटाच्या महिलांना अनेक उद्योग व्यवसायांबद्दल सखोल मार्गदर्शन केले आणि प्रत्यक्ष उद्योगाच्या भेटी घडवून दिल्या. तसेच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबींची देखील याप्रसंगी चर्चेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments