यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून पिकांच्या अवशेषचा वापर करून वाढवली जमिनीची सुपीकता:
संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सगरोळी च्या कृषी अभयांत्रिकी विभागाच्या माध्यमातून एक FLD प्रयोग " पिकांच्या अवशेषाचा वापर करून वाढवली जमिनीची व पिकांची सुपीकता " काटकळंबा येथे मार्च महिन्यामध्ये राबवण्यात आला होता. यांच्या FLD कार्यक्रमांतर्गत 22 Aug 2023 रोजी कटकलंबा येथे शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये डॉ. प्रियंका खोले, शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य, पिकांना लागणारे मूलभूत घटक, सध्या ॲग्रीकल्चर मध्ये असलेली चॅलेंजेस व त्यावर मात करणारे विकल्प सांगितले. त्याचबरोबर मोबाईल श्रेडर व त्यामुळे होणारे फायदे सांगण्यात व प्रतेक्षांत दाखवण्यात आले. कापसाच्या पराठ्यांचा सेंद्रिय पदार्थांमध्ये किती व कसे परिवर्तन होते याबद्दलही माहिती देण्यात आली व त्या नंतर घेतलेल्या पिकांच्या वाढीवर कसा चानगला परीणाम झाला आहे हे ही दाखवण्यात आले आहे.
#agriculture #machinery #crop #kvksagroli #nanded #FLD #climatechange #ClimateSmartFarming #farmers #farming
0 Comments