वाढत्या वयातील मुलांसाठी पौष्टिक तृणधान्य आहार महत्त्वाचा...
योग्य शारीरिक वाढीसाठी पौष्टिक आणि समतोल आहार महत्त्वाचा असतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मुख्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची नितांत गरज असते. असा आहार पौष्टिक तृणधान्यांच्या माध्यमातून सहज साध्य करता येतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी संस्कृती संवर्धन मंडळ येथील एनसीसी च्या कॅडेट्स साठी तृणधान्यांचे नियमित आहारातील महत्त्व या विषयावर डॉ माधुरी रेवणवार यांनी मार्गदर्शन केले. पावर पॉइंट प्रेझेंटेशन तसेच पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती देण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे आयोजन श्री आकाश शिंदे सर तसेच श्री मंगेश कुलकर्णी सर यांनी केले होते.
0 Comments