सगरोळीतील कृषी परिषदेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद : भरड धान्य व विषमुक्त शेतीविषयी तज्ञांचे मागर्दर्शन व रानभाजी महोत्सवाचे विशेष आयोजन

 सगरोळीतील कृषी परिषदेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद : भरड धान्य व विषमुक्त शेतीविषयी तज्ञांचे मागर्दर्शन व रानभाजी महोत्सवाचे विशेष आयोजन


ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा आदी भरड धान्य रोजच्या आहारात असल्यास अनेक आजारापासून दूर राहता येईल. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती देवगिरी प्रांत, आत्मा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 ऑगस्ट रोजी एक दिवसीय कृषी परिषदेचे आयोजन सगरोळी येथे करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे सेंद्रिय शेतीमाल व भरड धान्यापासून तयार केलेले उत्पादन प्रदर्शनी आणि 18 प्रकारच्या विशेष रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी मंचावर न्यायमूर्ती अंबादासराव जोशी (लोकायुक्त गोवा), देवगिरी प्रांताचे ग्रामविकास संयोजक विलासअण्णा दहिभाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे, संजय पाटील, महेश लोंढे, दिलीप देशमुख बारडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील देशमुख होते. यावेळी बीज भाषणात बोलताना श्री. दिनेश कुलकर्णी यांनी “ज्वारी, बाजरी, नाचणी आदींच्या माध्यमातून पदार्थांची निर्मिती व आहार संस्कृति रुजवावी हेच निरोगी भारताचे भविष्य असल्याचे म्हणाले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी दृकश्राव्यच्या माध्यमातून संवाद साधला. न्यायमूर्ती आंबदास जोशी यांनी लहरी पाण्यावरही भरड धान्याचे उत्पादन होत असल्याने लागवड व साठवण करावी असे सांगितले. संजय पाटील यांनी महाराष्ट्रातील पोषण धान्याची माहिती दिली. उद्योजक महेश लोंढे यांनी भरड धान्याची वैशिष्ट्ये, उत्पादने, प्रक्रिया, तंत्रज्ञान व बाजारपेठ याविषयी माहिती दिली. भाऊसाहेब बर्हाटे व दिलीप देशमुख बारडकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलासअण्णा दहिभाते तर सूत्रसंचालक उदय संगारेड्डीकर यांनी केले. देवगिरी प्रांत प्रचारक रामानंदजी काळे, प्रांत सहकार्यवाह धनंजयजी धामणे, प्रांत सहकार्यवाह माधवजी तांबरे, जिल्हा संघचालक डॉ. सुधीरजी कोकरे यांच्यासह मराठवाड्यातील जवळपास पाचशे शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
😍 #रानभाजी #महोत्सव



Post a Comment

0 Comments