खरीप पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी एक दिवशीय प्रशिक्षण
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाद्वारे अवक्रमित मातीचे पुनर्वसन व हवामान बदल अनुकूल कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने “खरीप पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम मौजे केदार वडगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणादरम्यान डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, हळद, मुग, उडीद ई. पिकातील विविध कीड व रोगांची ओळख आणि त्यांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांसोबत प्रक्षेत्र भेट करून पिक पाहणी करण्यात आली. श्री विजय भिसे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले होते.
#agriculture #kvk #nanded #sagroli


0 Comments