महिलांकरिता सुधारित शेती व तंत्रज्ञानाबद्दल तसेच वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाबद्दल एक दिवसीय प्रशिक्षण..

 महिलांकरिता सुधारित शेती व तंत्रज्ञानाबद्दल तसेच वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाबद्दल एक दिवसीय प्रशिक्षण..


महिलांकरिता सुधारित शेती व तंत्रज्ञानाबद्दल तसेच वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाबद्दल व त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी बद्दल माहिती देण्यात आली. संस्कृति संवर्धन मंडळ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र सगरोळी च्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्या प्रशिक्षणामध्ये शिवनी येथील 14 बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. डॉ प्रियंका खोले, विषय विशेषतज्ञ, यांनी महिलांच्या
जीवनामध्ये टेक्नॉलॉजी चे महत्व व सुधारित शेती अवजारांची व यंत्रची माहीती दिली. नाविन्यपूर्ण मशिनरीच्या व वेगवेगळ्या प्रक्रिया मध्ये उपयोगात येणाऱ्या अशा मशनरी बद्दल माहिती दिली. त्यामधे मनुष्यचलित अवजारे, सोलर व इलेक्ट्रिक यंत्रे इत्यादी तसेच अनेक नाविन्य पूर्ण मशिनरी बद्दल मार्गदर्शन केले.त्याचं बरोबर प्रोडक्ट, मार्केटिंग व ब्रॅण्डिंग बद्दलही महीती दिली.प्रशिक्षणार्थ्यांना दुपारच्या सत्रातील प्रक्षेत्र भेटी दरम्यान केव्हीके प्रक्षेत्रावरील विविध डेमो युनीट्स बद्दल श्री.तुकाराम मंत्रे यांनी माहिती दिली. तसेच प्रो.सुनीता पोपले,प्राचार्य,UTV BBA-ABM कॉलेज,सगरोळी,यांनी ही फूड प्रोसेसिग व उद्योजक्ता बद्दल महीती दिली. #womeninbusiness #womenownedbusiness #agricultureeducation #Machineries #kvksagroli #nanded #agriculture






Post a Comment

0 Comments