सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन
हवामान बदलांचा पिकावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय योजना आणि तसेच रासायनिक खते व किटकनाशके यांचा अतिवापर यामुळे जमिनीचे आरोग्य व तसेच मानवी आरोग्यावर होणार परिणाम आणि त्यावरील उपाय योजना या विषयी हवामान अनुकल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि हैप्पी सोईल (Happy Soil) प्रकल्प अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ६० शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलीचे आयोजन संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या तर्फे महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी येथे दोन दिवसीय दि. १० ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. या अभ्यास सहली दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रक्षेत्रा वरील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि निविष्ठा निर्मिती केंद्र, भाजीपाला-फुलशेती-फळबाग रोपवाटिका आणि म्युजियम, ड्रोन lab, एकात्मिक शेती पद्धत, ज्वारी सुधार प्रकल्प, कृषी अवजारे बँक, Biogas, polyhouse मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हळद आणि शेवगा लागवड, अति उच्च घनता लागवड (UHDP) तंत्रज्ञानाच्या आधारित आंबा लागवड इ. प्रात्यक्षिक प्रकल्पांना भेटी देवून माहिती घेण्यात आली. प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या प्रात्यक्षिक प्रकल्प आणि कृषी क्षेत्रामधील नवनवीन तंत्रज्ञानाच्या जोडीने व नाविन्य शेती पद्धती द्वारे महारष्ट्रातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा नेहमीच प्रयत्न सुरु असतो. सेंद्रिय शेती बाबत महत्व आणि जागरूकता शेतकऱ्यांमध्ये व्हावी याच उद्देश्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि आत्मविश्वास वाढावा या करिता अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सहल यशस्वी होण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. व्यंकट शिंदे आणि हवामान अनुकल शेती पद्धतीवर शेतकऱ्यांची क्षमता बांधणी आणि हैप्पी सोईल (Happy Soil) चे मुख्य अधिकारी श्री. सर्जेराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक दत्ता गिराम व माधव राजुरे तसेच प्रकल्प सहाय्यक पवन जाधव आणि सुनील भोयेवार इत्यादींनी परिश्रम घेतले. #organicfood #organicfarming #organic #natural #agriculture #kvksagroli #nanded #exploservisit #farmer #usconsulate #mumbai
0 Comments