आरोग्य तपासणी शिबिर व नैसर्गिक शेती प्रकल्प भेट...

 आरोग्य तपासणी शिबिर व नैसर्गिक शेती प्रकल्प भेट...

दि. 11 ऑक्टोबर 2023 रोजी बाभूळगाव व गंगणबीड ता. कंधार येथे संस्कृति संवर्धन मंडळ संचालित व नाबार्ड पुरस्कृत जिवा प्रकल्पा अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले गेले. महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत नांदेड येथील लोटस हॉस्पिटल चे डॉ पंकज टोके आणि अपेक्षा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ हांडे आणि टीम यांनी गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन उपचार केले. या शिबिराचा लाभ 400 पेक्षा अधिक गावकऱ्यांनी घेतला. या प्रसंगी नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री दिलीप दमय्यावार, नाबार्ड पुणे येथील श्री पंडीत, संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री सर्जेराव ढवळे, के व्हीं के च्या डॉ माधुरी रेवणवार श्री कानगुलवार व टीम उपस्थीत होती. सोबतच जिवा प्रकल्पातील अग्रणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर व त्याचा परिणाम देखील पाहण्यात आला. तसेच नैसर्गिक पद्धतीने पोषण बागेचे व्यवस्थापन व गांगमा मंडळ याबद्दल महिलांना माहीती देन्यात आली. #Ayushman #Bharat #Digital #missions #healthcare #HealthForAll #organicfood #natural #farming #organicfood #kvksagroli #nanded




Post a Comment

0 Comments