दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनांत करा भरपूर वाढ - डॉ. दिलीप पाटील तीन दिवसीय कापूस पिक प्रक्षेत्र भेटीदरम्यान शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन

 दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनांत करा भरपूर वाढ - डॉ. दिलीप पाटील तीन दिवसीय कापूस पिक प्रक्षेत्र भेटीदरम्यान शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन
भा.कृ.अ.न.प. (दिल्ली) केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने कापूस पिकावर हदगाव परिसरातील पांगरी, कावना, पिंगळी, वरकवाडी, वानवडी, ठाकरवाडी ईत्यादी गावात कार्यशाळा व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम दि. ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संस्कृति संवर्धन मंडळ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जि. नांदेड आणि भा.कृ.अ.न.प. (दिल्ली) केंद्रीय कापूस संशोधन संस्था (नागपूर), यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत विशेष कापूस प्रकल्प पीक प्रात्यक्षिक दादा लाड कापूस तंत्रज्ञान वर्ष २०२३-२४ च्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील हदगाव परिसरातील पांगरी, कावना, पिंगळी, वरकवाडी, वानवडी, ठाकरवाडी ईत्यादी गावातील येथील ठराविक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिलीप पाटील (सिकॅटरवाले साहेब) यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकातील दादा लाड तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. दादा लाड तंत्रज्ञानाबद्दल माहिती देताना त्यांनी शेतकऱ्यांना फळफांदी आणि गळफांदी यातील फरक ओळखण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि गळफांदी तसेच शेंडा कापून उत्पादन कसे वाढवावे याबद्दल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फांदी व शेंडा कापून प्रात्यक्षिक दाखविले. शेतकऱ्यांनी दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस पिकाचे उत्पादन वाढवावे असे त्यांनी आवाहन केले.
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळीचे पिक संरक्षण शास्त्रज्ञ तथा विशेष कापूस प्रकल्पाचे नांदेड जिल्हा नोडल ऑफिसर डॉ. कृष्णा अंभुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शेतकऱ्यांना कापूस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तीन दिवसीय कार्यशाळा तसेच प्रक्षेत्र भेटीदरम्यान हदगाव परिसरातील पांगरी, कावना, पिंगळी, वरकवाडी, वानवडी, ठाकरवाडी ईत्यादी गावातील सरपंच, प्रगतशील शेतकरी तसेच कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #agricultural #cotton#farmers #farming #farm #tech #technologies




Post a Comment

0 Comments