नाविन्यपूर्ण कृषि प्रकल्प स्पर्धा- २०२४

 नाविन्यपूर्ण कृषि प्रकल्प स्पर्धा- २०२४


संस्कृति संवर्धन मंडळाच्या कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा २०२४ आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी द्वारे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषि महोत्सवाचा (कृषिवेद-२०२४) भाग असेल. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करण्यासाठी या स्पर्धा आयोजन केले आहे.

स्पर्धेचे विषय

1. कष्ट कमी करणारे तंत्रज्ञान

2. हवामान अद्यावत, किफायतशीर व गरजू कृषि तंत्रज्ञान

3. मृद व जलसंधारण च्या संबंधित तंत्रज्ञान

4. काढणी आणि प्रक्रिया तंत्रज्ञान


सहभाग श्रेणी - नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धेत दोन श्रेणी आहेत

1. शाळा
    A. प्राथमिक
    B. माध्यमिक
    C. उच्च माध्यमिक
2. उच्च शिक्षण (पदवी / पदविका)


अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी स्कॅन करा किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करा - 

क्लिक


Link -  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeyFLyomuzvWNYpmMrotuTX6LbImTI2tAWLcM6mAnYYUI66hQ/viewform

Post a Comment

0 Comments