कृषिविषयक प्रयोगांचा ‘लॅब ते लॅंड’ हा प्रवास प्रभावीपणे झाला तरच शेतकऱ्यांना लाभ होईल”, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मा. श्री. भैय्याजी जोशी
“कृषिविषयक प्रयोगांचा ‘लॅब ते लॅंड’ हा प्रवास प्रभावीपणे झाला तरच शेतकऱ्यांना लाभ होईल”, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मा. श्री. भैय्याजी जोशी यांनी आज संकुलातील कृषी विज्ञान केंद्रास सदिच्छा भेटी दरम्यान सांगितले. सोबतच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन ही संख्या अधिकाधिक करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेण्याचे सुचविले. केव्हीके करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी दिली. यावेळी भैय्याजी जोशी यांच्या हस्ते संकुलात कांचन वृक्ष लावण्यात आले. त्यांनी तीस वर्षापूर्वी संकुलास भेटीची आठवण देत संस्थेच्या विस्तारलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. #Agriculture #kvk #nanded #kvksagroli #KrishiVigyanKendra
0 Comments