महिलांची शेतकरी उत्पादक कंपनी - बदलत्या काळाची गरज...
शेतकरी महिलांची उत्पादक कंपनी हे कौतुकास्पदच. आजच्या काळामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येताना दिसतात, परंतु त्यांची उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसाय करणे हे अतिशय स्तुत्य तसेच काळाची गरज आहे. बीलोली तालुक्यातील डोणगाव येथील रूपाली शिव या महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्यांना आज दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील डॉ. माधुरी रेवनवार यांनी कंपनीच्या अधिकच प्रगतीसाठी प्रक्रिया उद्योगा संदर्भात मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विभाग बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. सध्या या कंपनीमार्फत कृषी अवजारे बँक, धान्य खरेदी विक्री चालू आहे. स्मार्ट प्रकल्प अंतर्गत क्लिनिंग ग्रेडींग आणि वेअर हाऊस साठी प्रकल्प देखील मंजूर झालेला आहे. या कंपनीमार्फत यापुढे महिलांनी अन्नप्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया क्षेत्रांमध्ये उतरण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सोनटक्के कंपनीच्या अध्यक्षा सौ सोनटक्के तसेच कृषी विभागाचे श्री कांबळे आणि श्री मादळे उपस्थित होते. #women #WomensHealth #womeninbusiness #womenempowerment #womenownedbusiness #womensupportingwomen #womeninspiringwomen #SHG 
0 Comments