महिलांना धान्य साठवताना घ्यावयाची काळजी तसेच कीड नियंत्रणासाठी इंसेक्ट ट्रॅप
धान्यांची साठवणूक हा महिलांसाठी कौशल्याचा विषय आहे. धान्यांमध्ये कीड लागणे ही अडचण सर्व महिलांसाठी त्रासदायक ठरते. म्हणूनच धान्याची योग्य साठवणूक पद्धत या विषयावर संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र मार्फत दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी शिंपाळा या गावात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये महिलांना धान्य साठवताना घ्यावयाची काळजी तसेच कीड नियंत्रणासाठी इंसेक्ट ट्रॅप याची माहिती देण्यात आली व प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच हे इन्सेक्ट ट्रॅप प्रात्यक्षिकासाठी महिलांना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिंपळा गावातील 27 महिलांची उपस्थिती होती. #agriculture #rural #women #technology #youth #training
0 Comments