सगरोळीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान खाद्य महोत्सव व विविध उपक्रम पाहण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी

सगरोळीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान खाद्य महोत्सव व विविध उपक्रम पाहण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी 



तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवास सगरोळी (ता.बिलोली) येथे बुधवार (ता.७) रोजी  मोठ्या उत्साहास सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी हजरो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात  जिल्ह्यातील प्रयोगशील व यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विश्वनाथ होळ्गे, दापशेड (ता.लोहा) नैसर्गिक शेती, उमाजी नाईक चांडोळा (ता.मुखेड) पिक बदल, संदीप कदम, सुजलेगाव (ता. नायगाव) शेतीपूरक व्यवसाय, दशरथ पेडीवार, कुंडलवाडी (ता.बिलोली) शेतीपूरक व्यवसाय, सुभाष गळगे, सोमठाना (ता.उमरी) शेडनेटमधील शेती, केशव लिंगाळे, सोमठाणा (ता. उमरी) फळबाग लागवड, दिगंबर खपाटे, बन्नाळी (ता.धर्माबाद) प्रक्रिया उद्योग, गणपत याद्लोड, सगरोळी (ता.बिलोली) एकात्मिक शेती व अॅग्रो सायन्स हब शेतकरी उत्पादक कंपनी लि. लगळूद (ता.भोकर) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 




जिल्ह्यातील उद्योजक महिला तथा बचत गटांनी खाद्य महोत्सवात सहभाग नोंदविल असून आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी बचत गट व महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले, महिलांना स्वावलंबी बनविले अशा सर्व उद्योजक महिला व बचतगटांनी या खाद्य महोत्सवात सहभाग घेतला आहे. महोत्सवात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, शेती अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, भूजल सर्वेक्षण, भरड धान्य व पदार्थ, विविध यंत्र इत्यादी पन्नासहून अधिक विविध कंपन्यांनी आपले स्टॉल उभारले असून शेतकऱ्यांनी  मोठी गर्दी केली आहे.








Post a Comment

0 Comments