दुर्लक्षित कोरफडीवर मूल्यवर्धन करा.....

 दुर्लक्षित कोरफडीवर मूल्यवर्धन करा.....


संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे विविध शेती निष्ठांवर मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम नियमित सुरू असतात. कोरफडी सारख्या दुर्लक्षित वनस्पतीवर देखील प्रक्रिया करून त्यापासून साबण, शाम्पू , जेल , हँडवॉश यासारखे त्वचेसाठी औषधी सौंदर्य प्रसाधने तयार करता येतात. आज दि. 6 एप्रिल 2024 रोजी अशाच कोरफड मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक , त्याची पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंग देखील महिलांना शिकवण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रम वुमन फर्स्ट (Gender sensitisation) या प्रकल्पांतर्गत घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये लोहा, कंधार , हदगाव व बिलोली तालुक्यातील महिलांनी सहभाग नोंदविला. #Agricultural #trainingday #WomenSupportingWomen #womenempoweringwomen #RuralWomenEmpowerment #KrishiVigyanKendra #sagroli #kvksagroli



Post a Comment

0 Comments