शेती दिन : कांदा पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...

 शेती दिन : कांदा पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...

संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या वतीने भोसी ता. बिलोली शेतकऱ्यांच्या शेतात कांद्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (०.३%) वापर या बद्दल शेती दिन घेण्यात आला. सदरील प्रात्यक्षिक 13 शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले होते. त्या सर्वांनी सूक्ष्म अन्नद्रव्याच्या दोन फवारण्या कांदा पिकामध्ये घेतल्या. या फाव्र्नीच सर्व शेतकर्यांना चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे कांद्याची वाढ आणि आकार वाढला, तसेच पानांचा गडद हिरवा रंगही वाढला, अशी प्रतिक्रिया शेतकर्यांनी दिली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ.संतोष चव्हाण यांनी कांद्याच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली. #कांदा #पिक #सूक्ष्म #अन्नद्रव्य #onion #vegetables #KrishiVigyanKendra #crop #Agricultural



Post a Comment

0 Comments