शेडनेट मधील शिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम

 शेडनेट मधील शिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम


संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी अंतर्गत हळदा ता. कंधार येथे दि २०/०३/२०२४ रोजी शेडनेट मधील शिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या गावात 10 ते 12 शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी शेडनेटची उभारणी केली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान डॉ.संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्याला पिकाचे वाण निवड, जमीन तयार करणे, ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन, लागवडीचा हंगाम, रोग व कीड नियंत्रण याविषयी माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. #agriculture #farm #farmer #crop #vegetables #trainingday #kvksagroli #nanded




Post a Comment

0 Comments