केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आढावा भेट संपन्न

केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आढावा भेट संपन्न

भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी 28 व 29 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीला भेट दिली.
या भेटीदरम्यान, डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मागील बारा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेतला. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार, भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांचा आढावा घेण्याची सार्वत्रिक मोहीम सुरू आहे, त्याच अंतर्गत ही भेट झाली.
    डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या, जसे की उद्यमीता लर्निंग सेंटर, उत्कर्ष, उद्यानविद्या रोपवाटिका, रेशीम उद्योग, सेंद्रिय भाजीपाला युनिट, बीज तंत्रज्ञान युनिट, कस्टम हायरिंग सेंटर, निंबोळी अर्क युनिट, पोल्ट्री युनिट, शेळी पालन युनिट, दुग्ध व्यवसाय युनिट, शेततळे, मत्स्य पालन इत्यादी. त्यांनी सर्व प्रक्षेत्रांची पाहणी करून शास्त्रज्ञांशी संवाद साधला.    कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार यांनी मागील तीन वर्षातील विविध विस्तार कार्यांचे सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सघन कापूस लागवड व दादा लाड तंत्रज्ञान याबद्दल आयोजित कार्यशाळेत डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कापसाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
बेळकोणी येथील शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे आयोजित कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राची टीम व डॉ. फुके उपस्थित होते.डॉ फुके यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विविध कार्यप्रणालींचा आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित होते.
डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. #केंद्रीयकापूससंशोधनसंस्था #कृषीविज्ञानकेंद्रसगरोळी #कापूससंशोधन #भारतीयकृषीअनुसंधानसंस्था #विस्तारकार्यक्रम #शेतकरीउत्पादककंपनी #CottonResearch #दादालाडतंत्रज्ञान #शेतकरी

A review visit by senior scientists from the Central Cotton Research Institute, Nagpur, an institution under the Indian Council of Agricultural Research, New Delhi, was conducted at the Krishi Vigyan Kendra, Sagroli, on 28th and 29th August.
During this visit, Dr. Rahul Fuke, a senior scientist, gathered information about the various initiatives undertaken by the Krishi Vigyan Kendra. He took stock of the various extension programs implemented in the eight talukas of Nanded district through the Krishi Vigyan Kendra over the past twelve years. As per the directive of the Union Agriculture Minister, a comprehensive campaign to review all Krishi Vigyan Kendra in India is underway, and this visit was part of that initiative.
Dr. Fuke visited various initiatives of the Krishi Vigyan Kendra, such as the Entrepreneurship Learning Center, Utkarh, Horticultural Nursery, Silk Industry, Organic Vegetable Unit, Seed Technology Unit, Custom Hiring Center, Neem Oil Unit, Poultry Unit, Goat Rearing Unit, Dairy Business Unit, Farm Ponds, and Fisheries. He inspected all the fields and interacted with the scientists.
Dr. Madhuri Rewanwar, Senior Scientist and Head of the Krishi Vigyan Kendra, Sagroli, presented a report on various extension activities carried out over the past three years. On the second day, Dr. Fuke interacted with farmers at a workshop organized on intensive cotton cultivation and Dada Lad technology at a farmer's field and provided guidance on the technology required to increase cotton production.
The Krishi Vigyan Kendra, Sagroli team and Dr. Fuke were present at a program organized by a Farmer Producer Company in Belkoni. Dr. Fuke reviewed the various operational systems of Farmer Producer Companies and encouraged them. The District Superintendent of Agriculture and all Taluka Agricultural Officers were also present at the program.
Dr. Fuke expressed satisfaction with the functioning of the Krishi Vigyan Kendra, Sagroli and expressed the hope that it would continue to work for the development of farmers. hashtagagri hashtagfarmingcommunity hashtagsustainableagriculture hashtagruraldevelopment hashtagtechnologyinfarming hashtagagriculture hashtagcotton hashtagfarmers hashtagresearch hashtagdevelopment hashtagextension hashtagNanded hashtagMaharashtra hashtagIndia














Post a Comment

0 Comments