जागतिक शेळी दिनानिमित्त बावलगाव, कौठा आणि किन्हाळा येथे मार्गदर्शन व पशु आरोग्य शिबिरे..

जागतिक शेळी दिनानिमित्त बावलगाव, कौठा आणि किन्हाळा येथे मार्गदर्शन व पशु आरोग्य शिबिरे..


बावलगाव आणि कौठा येथे मार्गदर्शन व पशु आरोग्य तपासणी शिबिरे पार पडली. कौठा येथे डॉ. शंकर उदगिरे आणि बावलगाव येथे पशुधन पर्यवेक्षक श्री. भास्कर बुचलवार यांनी शेळीपालनाचे आर्थिक महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन केले. शिबिरात शेळ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि लसीकरण करण्यात आले. किन्हाळा येथे आयोजित शेती दिन कार्यक्रमात शेळीपालकांनी शेळीपालनातील अडचणींवर चर्चा केली. प्रगतिशील शेळीपालक श्री. विठ्ठल माने यांच्या प्रकल्पावर, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. निहाल मुल्ला यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पालनपद्धती, पोषण व आरोग्य विषयक सल्ला दिला. कार्यक्रमाचे आयोजन पशुसंवर्धन विभाग, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि रिलायंस फाऊंडेशन यांनी केले. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री. बालाजी नरहरी, श्री. शिवाजी केंद्रे, श्री. दिगंबर कोंडलाडे आणि श्री. मारोती वड्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. #शेळीपालन #शेतकरी #ग्रामीणभारत #विकास #जागतिकशेळीदिन #मार्गदर्शन #पशुआरोग्य #कृषिविज्ञानकेंद्र #रिलायंसफाऊंडेशन #Agriculture #AnimalHusbandry #RuralDevelopment #Farmers #Goats #HealthyLivestock #ModernFarming






Post a Comment

0 Comments